शहरात 46 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात फळे व भाजीपाला केंद्र

शहरात 46 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात फळे व भाजीपाला केंद्र


पहिल्या टप्प्यात सात केंद्र सुरू; महापालिका प्रशासनाचा निर्णय

पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांना भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्राथमिक स्तरावर एकूण 46 ठिकाणी फळे व भाजीपाला विक्री केंद्र तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात एकूण 7 ठिकाणी फळे व भाजीपाला केंद्र सुरू केले आहेत. तथापि, शहरातील 7 भाजी मंडई मात्र पुढील आदेशापर्यंत बंद केल्या आहेत.

देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांना भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने शहरात प्रत्येक प्रभागामध्ये मोकळ्या जागेत किमान एक या तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे. संबंधित केंद्रांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत भाजी विक्री केली जाणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणारी फळे व भाजीपाला विक्री केंद्रे टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येतील. दरम्यान, शहरातील महापालिकेच्या पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, वाकड, भोसरी आणि थेरगांव येथील बंदिस्त भाजी मंडई पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येतील, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.


केंद्रांमध्ये काय असतील सुविधा :

केंद्रामध्ये येणाऱ्यांसाठी काही नियम निश्‍चित केले आहेत. या केंद्रांमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश करेल, अशी व्यवस्था याठिकाणी असणार आहे. नागरिकांना जाण्या-येण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतील. या ठिकाणी आलेल्या व्यक्तींनी सोशल डिस्टंसिंग पाळणे अनिवार्य असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी एकाच वेळी जास्त नागरिक आल्यास त्यांच्यासाठी सोशल डिस्टंसिंगनुसार स्वतंत्र प्रतिक्षालयाची देखील व्यवस्था केली जाईल. नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांचे शारिरीक तापमान तपासण्यासाठी इन्फारेड थरमल गनचा वापर या केंद्रांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी एका जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक देखील करण्यात येईल.

पहिल्या टप्प्यातील फळे व भाजीपाला केंद्रे :

1) नियोजित महापौर निवासस्थान मोकळे मैदान, सीटी प्राईड शाळेशेजारी, निगडी-प्राधिकरण
2) डी- मार्ट शेजारील भूखंड, रावेत.
3) गाव जत्रा मैदान, भोसरी.
4) अण्णासाहेब मगर स्टेडीयम, नेहरूनगर-पिंपरी.
5) सीडीसी ग्राऊंड, शनिमंदिर समोर, पुर्णानगर-चिखली.
6) सर्व्हे क्रमांक 628, वनदेवनगर-थेरगाव.
7) पीडब्लूडी ग्राऊंड, सांगवी.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook