दादासाहेब थोरात, प्रतिनिधी, भिगवण
कोरोनाने जनतेच्या नाकात नउ आणले आहे शासन कोरोनाच्या लढ्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे डॉक्टर, आणि पोलिस या लढ्याचे प्रमुख सेनानी आहेत मात्र हा लढा लढत असताना पोलिस आणि प्रशासन निशस्त्र आहेत आपल्या जिवाशी खेळून रुग्नांना बरे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत तर समाजात कोरोनाचा प्रसार होउ नये म्हणून रस्त्यावर पोलिस आहोरात्र लढत आहेत ही बाब लक्षात आल्याने अ आर फाउंडेशनने तिनशे पीपीई किट वाटप केले आहेत तर सोहळाशे बिस्किट किट वाटप केले आहेत अशी माहिती फाउंडेशनचे राम गायकवाड यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन
उन्हातानात अन्न पाण्याविना कर्तव्यावर असलेले पोलिस संकटाला रोखून धरण्यासाठी जिवाची पराकष्टा करत आहेत, दररोज बंदोबस्तसाठी असणाऱ्या बारामती, भिगवन, उजनी, अकलूज, टेंभुर्णी, पुणे, या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी दररोज ५० बिस्किट पाणी बॉक्स स्वखर्चाने मदत करत आहेत. भिगवण पोलिसांना आज किटचे वाटप करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी किट स्विकारले व पीपीई किट म्हत्वाचे असुन आजच्या काळात पोलिसांना सुरक्षेची गरज आहे ती ए आर फाउंडेशनने दिल्याचे सांगितले.
कोरोनाच्या लॉकडाउन आत्ता पर्यंत, “एक हजार सहाशे” पाणी-बिस्कीट बॉक्स ची मदत केली आहे आणि आजही मदत चालूच आहे,
तसेच या पुढे भविष्यात जेंव्हा जेंव्हा मदतीची गरज पडेल तेंव्हा तेंव्हा राम गायकवाड व अमृता भोजने तत्काळ मदतीसाठी धाऊन येउ असे राम गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड, वरपे, भोजने या परिवाराच्या मार्गदर्शना खाली ए.आर. फाऊंडेशन व ए.आर. फॅमिली पदाधिकारी समाजसेवेचे काम करत आहेत.
बाबासाहेब सोनवणे, डॉ.इनामदार,गोपाळ वासकर,
जय भोजने,बालाजी सिरसट,अनिल माने, केशव पाटील रफिक इनामदार, काशिनाथ धनगर, सुरज भोसले, आनंद खंडागळे, मोहन गायकवाड, समाधान गायकवाड, लखन गायकवाड, हर्षल पवार.
कविता काकडे, शोभा कोंडे, दीक्षा रिठे, साक्षी शिंदे, श्रुतिका टिळेकर, प्रणिता इंगळे, आदी हे काम करत आहेत.
आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत मात्र आपण घरी रहा सुरक्षित रहा, शासन-प्रशासन, डॉ असोसिएशन,यांना लाख मोलाचं सहकार्य करा, कोरोनाशी लढा देऊन करोना नष्ट करुया असे ए.आर. फाऊंडेशन व ए.आर. फॅमिलीने जनतेला आव्हान करत आहे.