वीजबिलांची छपाई बंद, बिल भरणा ‘ऍप’ सुरू

वीजबिलांची छपाई बंद, बिल भरणा ‘ऍप’ सुरू

महावितरणकडून “ऑनलाईन’ भरण्याची सोय

पुणे – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गेल्या 23 मार्चपासून महावितरणने वीजबिलांची छपाई व वितरण बंद केले आहे. मात्र, महावितरणने मोबाइल ऍप, वेबसाईट व “एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिल मिळविणे व ते “ऑनलाईन’ भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे शहरामधील कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, नगररोड, पद्मावती, पर्वती, बंडगार्डन या महावितरणच्या विभागांमधील 14 लाख 88 हजार 211 ग्राहकांनी, पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी व व पिंपरी विभागातील 6 लाख 15 हजार ग्राहकांनी तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्‍यांतील 6 लाख 83 हजार 968 वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली असून यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मोबाइल क्रमांक नोंदणीची सोय…
पुणे परिमंडलमधील उर्वरित वीजग्राहकांना सुद्धा महावितरणच्या 9930399303 या क्रमांकावर “एसएमएस’द्वारे मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाइल क्रमांकावरून 9930399303 क्रमांकावर चठए(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून “एसएमएस’ केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24ु7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल ऍपद्वारे मोबाइल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook