एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढतंय. तर दुसरीकडे अनेक देशात लॉकडाऊनमुळे प्रदूषणातदेखील घट झालीय. त्यामुळे आजचा चंद्र खूप खास असणार आहे. आज चंद्र इतर दिवसापेक्षा अधिक सुंदर आणि मोठा दिसणार आहे. आज रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी पिंक सुपरमून अनुभूती खगोलप्रेमींना मिळतंय.
आज चंद्र पृथ्वीच्या २७४९३ किलोमीटर जवळ येणार आहे. चंद्राचा आकार सामान्यपेक्षा ७ पट जास्त असेल व त्याची चमक देखील ३० टक्के अधिक असेल. उत्तर अमेरिकेत राहणारे लोक हा चंद्र आज रात्री पाहू शकतील. भारतातील सुपरमून ८ एप्रिल रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:४५ वाजता होणार आहे. त्यामुळे भारतीयांना याची अनुभूती घेता येणार नाही.
Tags:
Punjab