मिळालेला वेळ सकारात्मक गोष्टी करण्यासाठी घालवा – अक्षया देवधर

मिळालेला वेळ सकारात्मक गोष्टी करण्यासाठी घालवा – अक्षया देवधर

कोरोनच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग हे लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाऊनच्या काळात टीव्ही मालिकांचं चित्रीकरणही ठप्प आहे, आणि आपले आवडते कलाकारही आपापल्या घरात बंद आहेत. पण मिळालेला वेळ हा सत्कारणी लावा असं  ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतल्या पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर म्हणतेय.

अक्षया पुण्यात तिच्या घरी कुटुंबियांसोबत आहे. तिच्या लॉकडाऊन मधील रूटीनबद्दल सांगताना ती म्हणाली,  “हातात मिळत असलेला वेळ सकारात्मक कामांसाठी घालवायचा प्रयत्न करते. कंटाळा, नकारात्मक विचार येऊ नयेत यासाठी ते गरजेचं आहे. मी कधी चित्र काढेन असं मला वाटलं नव्हतं पण लॉकडाऊन मध्ये मी बऱ्यापैकी चित्रकला शिकलेय. तसंच आईकडून अनेक पदार्थ देखील शिकतेय. आम्ही दोघी मिळून किचनमध्ये काहीना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. याशिवाय मी वाचन, टीव्ही, सिनेमे बघणे यात सध्या वेळ घालवतेय.”

अक्षयाचे आई-वडील दोघेही सरकारी सेवेत असल्याने कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही त्यांना कामासाठी बाहेर पडावं लागतं. “मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली अभिनेत्री आहे. माझे आई-वडील सरकारी सेवेत आहेत. दोघेही अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांना या संकटकाळात कामासाठी बाहेर पडावंच लागतं,” असं अक्षयानं सांगितलं.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook