लॉकडाऊन घोषीत झाल्यापासून सगळ्याच प्रकारच्या शूटिंग बंद झाल्या. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या दैनंदिन मालिकांना मुकावं लागलं. दररोज घरोघरी पाहिल्या जाणाऱ्या दैनंदिन मालिकांच्या काही भागांचं बँकिंग होतं त्यामुळे काही दिवस मालिकांचे नवीन भाग सुरू राहीले. मात्र ते संपल्यानंतर काही मालिकांचे जुने भाग तर काही मालिका अगदी पहिल्या भागापासून पुन्हा दाखवणं सुरू झालं. नुकतीच राज्य सरकारने काही नियमांच्या बंधनात राहुन सगळ्या प्रकारच्या शूटिंगला परवानगी दिली. त्यानंतर आता लवकरच सगळं पूर्ववत होईल असं बोललं जात होतं. यातंच आता तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
तुझ्यात जीव रंगला ही मालिका कोल्हापुरात शूट होते. लवकरच या मालिकेचं शूटिंग कोल्हापुरात सुरू होणार असून कलाकार त्यासाठी सेटवर लवकरच रुजू होणार आहेत. येत्या आठवड्यात मालिकेच्या सेटवर सॅनिटायझेशन केलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे सॅनिटायझेशन पूर्ण होताच पूर्ण खबरदारी घेऊन आणि कोरोनाच्या सध्य परिस्थितीवर राज्य सरकारने आखून दिलेल्या सगळ्या नियमांच्या बंधनात राहुन हे शूट पार पडणार आहे.
मालिकेचं शूट सुरू झालं की काही दिवसातंच मालिकेचे नवीन भाग सुद्धा प्रेक्षकांना अनुभवता येतील हे निश्चित. सध्या मालिकांचे छोटे-छोटे वेब एपसिोड पाहता येत होते पण ते फ्कत ऑनलाईन घडत होतं त्यामुळ रोज घरात टिव्हीवर मालिका पाहणाऱ्यांसाठी त्यांची दररोजची पर्वणी लवकरच सुरू होणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर आता अजून किती मालिका पुन्हा शूट सुरू करत पुन्हा नवीन भाग सुरू करतात ते येत्या काही दिवसात कळेलंच.