१५ जून नंतर मध्यवर्ती पेठांमधील ९० टक्के दुकाने उघडणार

१५ जून नंतर मध्यवर्ती पेठांमधील ९० टक्के दुकाने उघडणार

कोरोना च्या आपत्तीमुळे पुण्यातील प्रमुख बाजारपेठा गेले सुमारे ८५ दिवस बंद असून व्यापारी आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत ,त्या मुळे यासंकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी या साठी व्यापारी आक्रमक झाले आहेत.त्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रशासन आणि व्यापारी महासंघाची बैठक विधान भवन येथे पार पडली.प्रशासन दुकाने न उघडण्यावर तर व्यापारी दुकाने उघडण्यावर आग्रही होते बऱ्याच वेळ उहापोह झाल्यानंतर तोडगा निघत नसल्याने सरते शेवटी मंगळवारी सकाळी परिस्थितीचा जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली .त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी आज पुणे म न पा तर्फे आज सयुंक्त मीटिंग बोलावण्यात आली होती.
मीटिंग मध्ये राज्य सरकारचे विशेष नेमणूक अधिकारी सौरभ राव यांनी पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन द्वारे बाधीत क्षेत्र संभंधि विस्तृत माहिती दिली व केंद्र ,राज्यशासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा उहापोह केला,तसेच व्यापारी आजपर्यंत सुमारे ८५ दिवस दुकाने बंद ठेवून स्वतः झळ सोसत आहेत याची प्रशासनाला कल्पना असून व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत.
केंद्र शासनाच्या नियमानुसार एकदा कंटेन्टमेंट झोन प्रसिद्ध केल्यानंतर तो किमान १४ दिवस बदलता येत नसल्याने व्यापाऱ्यांनी आणखी ५ दिवस दुकाने बंद करून सहकार्य करावे, १५ तारखेला प्रशासन बाधित क्षेत्रातील नवीन मायक्रो कॉन्टेन्टमेन्ट झोन बनवेल व १५ तारखेला व्यापारी महासंघासोबत मीटिंग घेऊन त्याबाहेरील विभागात ९० टक्के दुकाने उघडण्यास परवानगी देईल.प्रशासनाच्या अडचणी व मर्यादा समजून व्यापारी महासंघाने अनिच्छेनं का होइना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.ह्या नंतरही दुकाने उघडण्यासंदर्भात चालढकल झाली तर व्यापारी महासंघ चर्चेला बसनार नाही व पुढे उद भवण्नाऱ्या परिस्थिती ला प्रशासन जबाबदार राहील असे ही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी सौरभ राव , पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे ,म न पा सह आयुक्त शंतनू गोयल ,अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे ,अशोक मोराळे ,उपयुक्त मितेश गट्टे ,स्वप्ना गोरे ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका,सचिव महेंद्र पितळीया ,उपाध्यक्ष रतन किराड,मनोज सारडा ,जयंत शेटे ,अरविंद कोठारी ,विपुल अष्टेकर,शरद सारडा ,मोहन पटेल ,नितीन काकडे ,नितीन पोरवाल ,यशस्वी पटेल ,कृषी खंडेलवाल ,मिठालाल जैन ,सुरेश जेठवाणी ,राजेंद जोशी ,बॉबी मैनी ,सोहन ओसवाल ,प्रीतम बाफना ,राजू ओसवाल ई .सभासद उपस्थित होते .

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook