मुंबई – नाट्य निर्माता संघात पडलेल्या फुटी नंतर निर्माण करण्यात आलेल्या जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची अधिकृत घोषणा सोमवारी झूम मिटिंगद्वारे करण्यात आली.. यावेळी नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा ह्यावेळी करण्यात आली.
नाटक मोठं करण्याच्या दृष्टीने आणि नाट्यव्यवसाय आणखी सुरळीत सुरू होण्याच्या दृष्टीने ह्या नवीन निर्माता संघाची स्थापना करण्यात आली. लवकरच ह्या निर्माता संघाचा दृष्टिकोन आणि कार्यक्रम कळेल असं प्रवक्ते श्री. अनंत पणशीकर ह्यांनी सांगितले. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ असे ह्या संघाचे नाव असल्याने नाटक करणारे सर्वच म्हणजे व्यावसायिक, हौशी, प्रायोगिक, समांतर सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी विचार करेल अशी अपेक्षा एक प्रायोगिक नाट्य रंगकर्मी म्हणून करायला हरकत नाही..
सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने ह्या निर्माता संघाने कार्य केले तर भविष्यात बाहेरगावच्या रंगकर्मीना मुंबई, पुण्यात नाटक करताना येणारे अडथळे दूर होऊ शकतील..
नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे –
अध्यक्ष – अमेय खोपकर
उपाध्यक्ष – महेश मांजरेकर
कार्यवाह – दिलीप जाधव
सह कार्यवाह – श्रीपाद पद्माकर
खजिनदार – चंद्रकांत लोकरे
प्रवक्ता – अनंत पणशीकर
मेंबर्स – सुनील बर्वे, नंदू कदम
कायदा सल्लागार – हर्षद भडभडे
मार्गदर्शक – लता नार्वेकर, प्रशांत दामले
दुसऱ्यांची रेष पुसण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही तर स्वतःची रेष मोठी करण्यात आम्हाला आनंद आहे असं प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष अमेय खोपकर ह्यांनी ह्या प्रसंगी केले ते सकारात्मक वाटले.