रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, आता ‘या’ सरकारी अॅपमधून घर बसल्या धान्य मिळणार

रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, आता ‘या’ सरकारी अॅपमधून घर बसल्या धान्य मिळणार

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आणि स्थलांतरितांना देशात कुठेही सहजपणे परवडणारे स्वस्त धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.


नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आणि स्थलांतरितांना देशात कुठेही सहजपणे परवडणारे स्वस्त धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजनेला (One Nation One Ration Card Scheme) सुरुवात केलीय. या अंतर्गत रेशनकार्ड धारकांना देशात कुठेही आपलं हक्काचं धान्य घेता येणार आहे. मात्र, एकिकडे कोरोना संसर्गाचा धोका आणि दुसरीकडे पोटाची भूक भागवण्यासाठी अनेकांना रांगांमध्ये उभं राहावं लागतंय. त्यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी ‘मेरा राशन अॅप’ (Mera Ration App) हे अॅप लाँच करण्यात आलंय. याचा उपयोग करुन तुम्ही घर बसल्या धान्य मागवू शकता (One Nation One Ration Card Scheme Mera Ration App in India).


‘वन नेशन वन राशन कार्ड योजने’ अंतर्गतच संबंधित अॅप सुरु करण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांना घर बसल्या आपलं रेशन बूक करता येणार आहे. खाद्य सचिव सुधांशु पांडे म्हणाले, “या मोबाईल अॅपचा उद्देश्य एनएफएसएचे लाभार्थी, स्थलांतरीत लाभार्थी, योग्य दरात धान्य उपलब्ध असणारं दुकान (Fair Price Shop) (रेशन दुकान) आणि इतरांमध्ये समन्वय साधत योग्य सेवा देणं हा आहे.

नोंदणीनंतर नागरिकांना लाभ मिळणार

मेरा राशन अॅपचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी नागरिकांना गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करावं लागेल. इंस्टालेशन केल्यानंतर अॅपमध्ये तुमच्या रेशन कार्डमधील सर्व माहिती भरा. यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही या अॅपचा उपयोग करुन तुमचं रेशन मागवू शकता.

अॅपचे फायदे

1. स्थलांतरित कामगार रोजगारानिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यावरही रेशन दुकानातून धान्य मिळणार.

2. या अॅपमुळे जवळच्या रेशन दुकानाची सहज माहिती मिळणार. रेशन विक्रेत्याचीही माहिती या अॅपमध्ये मिळेल.

3. रेशन कार्डधारक या अॅपमधून आपल्या तक्रारी देखील नोंदवू शकतात.

4. रेशन कधी आणि कसं मिळणार याचीही अॅपवर माहिती मिळणार.

5. रेशनकार्ड धारक या अॅपवर याआधीच्या रेशन खरेदीचे तपशीलही पाहू शकणार. त्यामुळे आपण कोणत्या महिन्याच किती धान्य भेटलं हे स्पष्ट होईल.

14 भाषांमध्ये अॅप उपलब्ध होणार

Mera Ration App हे मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह देशातील 14 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मजुरांना किंवा स्थलातरिंत कामगारांना भाषेची कोणतीही अडचण येणार नाहीये.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook