2020 मध्ये, महामारीच्या शिखरावर, भारताला केवळ 23 देशांमध्ये प्रवेश होता. पण आता भारतीय पासपोर्टधारकांना या 60 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे.
या वर्षी मार्चमध्ये कोविड प्रादुर्भावामुळे - सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी उठवल्यानंतर, भारतीय पासपोर्टने काही प्रमाणात पुन्हा ताकद मिळविली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक पासपोर्ट रँकिंग चार्टमध्ये, देशाने 199 पासपोर्टमध्ये 87 वा क्रमांक पटकावला आहे.
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स देशांच्या परस्परांशी असलेल्या राजनैतिक संबंधांची ताकद परिभाषित करतो. एखादा देश इतरांना जितका अधिक 'अॅक्सेस' ऑफर करतो, तितकी त्याची रँकिंग जास्त असते. हा निर्देशांक संकलित करण्यासाठीचा डेटा इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) कडून घेण्यात आला आहे.
2020 मध्ये, महामारीच्या शिखरावर, भारताला केवळ 23 देशांमध्ये प्रवेश होता. पण आता भारतीय पासपोर्टधारकांना या 60 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे.
हेन्ली पासपोर्ट निर्देशांक त्रैमासिक प्रकाशित केला जातो आणि गेल्या तिमाहीत, भारत 2021 च्या क्रमवारीत 90 व्या स्थानावरून 83 व्या क्रमांकावर होता.
.