पुणे : – Pune PMC Election 2022 | पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणानुसार (OBC Reservation) ही आरक्षण सोडत झाली आहे. पुण्यात 58 प्रभाग असून या प्रभागातील 173 जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यावेळी पालिकेचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या सोडतीमध्ये एकूण 87 जागेसाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. (Pune PMC Election 2022)
—
आज झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये (Pune PMC Election 2022) सर्वपक्षीय बहुतांश नेत्यांना दिलासा मिळाला आहे. बहुतेक नेत्यांना त्यांच्या प्रभाव क्षेत्र असलेल्या प्रभागांमधून निवडणूक लढवता येणार आहे. परंतु शनिवार पेठेतील प्रभाग 17 मध्ये भाजपच्या अनेक इच्छुकांची गर्दी असताना या प्रभागात तीनपैकी एक जागा सर्वसाधारण असणार आहे. तर एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी एक जागा मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित झाली आहे.
यामुळे या प्रभागातून इच्छुक असलेले आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) यांचे पुत्र कुनाल टिळक (Kunal Tilak), स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Standing Committee Chairman Hemant Rasane), ज्येष्ठ नगरसेवक राजेश येनपुरे (Senior Corporator Rajesh Yenpure), धीरज घाटे (Dheeraj Ghate) यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न भाजपसमोर (BJP) असणार आहे. खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या सून स्वरदा बापट या देखील याच प्रभागातून इच्छुक आहे. त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
– सर्वसाधारण प्रवर्गातून 102 नगरसेवक
– मागासवर्गीय प्रवर्गातून 46 नगरसेवक
– अनुसूचित जातीतून 23 नगरसेवक
– अनुसूचित जमातीतून 2 नगरसेवक निवडले जाणार आहेत. या प्रत्येक प्रवर्गात 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आसणार आहेत.
—
प्रभागानुसार अ, ब. क आरक्षण सोडत
1) धानोरी – विश्रांतवाडी (अ – अनुसूचित जाती, ब-अनुसूचित जमाती (महिला), क-सर्वसाधारण )
2) टिंगरेनगर – संजय पार्क (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला). ब- सर्वसाधारण (महिला), क-सर्वसाधारण)
3) लोहगाव – विमान नगर ( अ – अनुसूचित जाती (महिला), ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, क-सर्वसाधारण (महिला)
4) कळस – फुलेनगर ( अ – अनुसूचित जाती, ब-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), क-सर्वसाधारण
9) येरवडा (अ – अनुसूचित जाती (महिला) ब – सर्वसाधारण (महिला). क – सर्वसाधारण
10) शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी (अ-अनुसूचित जाती (महिला), ब- सर्वसाधारण (महिला), क – सर्वसाधारण
11) बोपोडी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (अ – अनुसूचित जाती, ब-सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
12) औंध – बालेवाडी (अ – अनुसूचित जमाती ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) क- सर्वसाधारण
13) बाणेर – सुस म्हाळुंगे (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब-सर्वसाधारण)
14) पाषाण – बावधन बुद्रुक (अ – अनुसूचित जमाती ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) क-सर्वसाधारण
15) वडारवाडी – गोखलेनगर (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण
16) फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे ( अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब सर्वसाधारण (महिला) क सर्वसाधारण
—
रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल (अ – अनुसूचित जाती ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) क- सर्वसाधा
20) पुणे स्टेशन – ताडीवाला रोड (अ – अनुसूचित जाती (महिला) ब-सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
21) कोरेगाव पार्क-मुंढवा (अ – अनुसूचित जाती (महिला) ब -नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क- सर्वसाधारण (महिला
22) मांजरी – शेवाळवाडी (अ – अनुसूचित जाती ब – सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
23) साडेसतरानळी – आकाशवाणी (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
—
24) मगरपट्टा – साधना विद्यालय (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण)
25) हडपसर गावठाण – सातववाडी (अ-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
26) वानवडी गावठाण – वैदुवाडी (अ – अनुसूचित जाती (महिला) ब – सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण
27) कासेवाडी – लोहियानगर (अ – अनुसूचित जाती ब – सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण
28) महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
29) खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
30) जयभवानी नगर – केळेवाडी (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
31) कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
32) भुसारी कॉलनी – सुतारदरा (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
33) बावधन खुर्द – महात्मा सोसायटी (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
34) वारजे – कोंढवे धावडे (अ -नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
35) रामनगर – उत्तमनगर शिवणे (अ -नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
36) कर्वेनगर (अ -नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण
37) जनता वसाहत – दत्तवाडी (अ – अनुसूचित जाती ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) क- सर्वसाधारण (महिला
38) शिवदर्शन – पद्मावती (अ – अनुसूचित जाती ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण (महिला
39) मार्केटयार्ड – महर्षी नगर (अ – अनुसूचित जाती (महिला) ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क- सर्वसाधारण (महिला)
40) गंगाधाम – सॅलीसबरी पार्क (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
41) कोंढवा खुर्द – मिठानगर (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
42) सय्यदनगर – लुल्लानगर (अ – अनुसूचित जाती (महिला) ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क- सर्वसाधारण (महिला)
43) वानवडी – कौसरबाग (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
44) काळेपडळ – ससाणेनगर (अ- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
45) फुरसुंगी (अ- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
46) मोहम्मदवाडी – उरुळी देवाची (अ – अनुसूचित जाती (महिला) ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क- सर्वसाधारण (महिला)
47) कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी (अ – अनुसूचित जाती (महिला) ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क- सर्वसाधारण (महिला)
48) अप्पर सुपर इंदिरानगर (अ – अनुसूचित जाती (महिला) ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क- सर्वसाधारण)
49) बालाजीनगर – के के मार्केट (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
50) सहकारनगर – तळजाई (अ – अनुसूचित जाती ब- सर्वसाधारण (महिला) क- सर्वसाधारण)
—
51) वडगाव – पाचगाव पर्वती (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
52) नांदेडसिटी – सनसिटी (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
53) खडकवासला – नऱ्हे (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
54) धायरी – आंबेगाव (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
55) धनकवडी – आंबेगाव पठार (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
56) चैतन्यनगर – भारती विद्यापीठ (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
57) सुखसागर नगर – राजीव गांधी नगर (अ- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)
58) कात्रज – गोकुळनगर (अ – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ब- सर्वसाधारण (महिला) क – सर्वसाधारण)