पुणे : पुण्याचे माजी आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज, बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. निम्हण हे शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघाचे १५ वर्षे आमदार होते. (Pune Ex MLA Vinayak Nimhan passes away)
विनायक निम्हण (Vinayak Nimhan) हे पुण्यातील (Pune) शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून १५ वर्षे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. सन १९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. आधीच्या दोन टर्म ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून गेले होते, तर नंतरची टर्म ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून विधानसभेवर गेले होते.
विनायक निम्हण यांना प्रकृती अस्वास्थ्यानंतर औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. निम्हण यांच्यावर आज रात्री पाषाण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.