गेले काही महिने वाढलेले भाजी- पाल्याचे दर गेले १-२ दिवसांपासून आवाक्यात आल्याने म्हसळयातील भाजी- पाला खाणारा वर्ग खूष झाला आहे.काही महिन्यापासून भाजीपाल्या- चे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे पाले-भाज्या आणि अन्य भाज्या खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. मेथी ३० ते ५० व कोथिंबीर ३०ते ३५ रुपये जुडी, वांगी , गवार, टोमॅटो ६०-८०रुपये किलो असे भाव होते.ते आता स्वस्त झाल्याने म्हसळा शहरांत भाजी- पाला खाणारा सर्वसामान्य ग्राहक खूष झाला आहे.त्यातच औषधी गुर्णधर्म असणारा आवळा आणि ओली हळद(भाव रु८०- १००)बाजारात आली आहे म्हसळा शहरांत बहुतांश भाजीपाला पुणे,वाई, वाशी (नवी मुंबई) मधून येत असतो, आणि माणगाव, मेंदडी-खरसई- वडवली या भागांतून गावठी भाजी- पाला फार कमी प्रमाणांत येतो, मागील दोन दिवसां पासून कोथींबीर, मेथी, पालक, माठ, शेपू,मूळा या सर्व पाले भाज्यांचा दर रु१५-२० जूडी , लिंब १०रु ४नग,टॉमेटो २०,काकडी ३०- ४० कांदा- बटाटा ३०, लसूण ७०- ८०, आल रु६०, मटार ८०-१००,भेंडी रु५०ते ६०, सिमला मिरची ४०-५०, कोबी-फ्लॉवर रु४०-६०, परतीचा पाऊस थांबल्यामुळे भाजीपाल्याची घाऊक बाजारात पुन्हा मोठ्या प्रमाणात आवक वाढली म्हणून भाजी पाल्याचे भाव कमी झाल्याचे म्हसळा शहरांतील होलसेल व्यापारी अशोकशेठ अडागळे यानी सांगितले. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाला स्वस्त झाला त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. शहरांत भाजी-पाला विक्रेते घाऊक - किरकोळ किमान २५-३० आहेत, यापुढे किमान ६-७ महीने भाजी पाल्याचे भाव स्थिर रहातील असेही जाणकार व्यापाऱ्यानी सांगितले.
फोटो.
Tags:
Maharashtra