मुंबई :– विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्यानंतर भाजप (BJP) नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. भाजप नेत्यांनी अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर आक्रमक कार्यकर्त्यांनी निदर्शने करत निषेध व्यक्त केला आहे. याच दरम्यान भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांनी अजित पवार यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, अजित पवार यांना ‘धरणवीर’ पुरस्कार देणार असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी अहमदनगरच्या नामांतराच्या मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले, स्थानिकांकडून नामांतराची मागणी झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही, अहमदनगरची (Ahmednagar) जनता जोपर्यंत मागणी करत नाही तोपर्यंत जिल्ह्याबाहेरच्या एखाद्या व्यक्तींनी अशी मागणी करणं मला संयुक्तिक वाट नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार?
महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.
बाल शौर्य पुरस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक (Swarajrakshak) होते, धर्मवीर (Dharmaveer) नव्हते.
त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असताना त्यावेळी स्पष्ट सांगितले होते,
संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, अशी भूमिका अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना मांडली होती.
Tags:
Maharashtra