Pune Water Supply | बुधवारी पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water Supply | बुधवारी पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार


पुणे :– 
चतु:श्रृंगी पाणीपुरवठा (Pune Water Supply) विभागांतर्गत चतु:श्रृंगी टाकीच्या मुख्य जलवाहीनीच्या दुरूस्तीचे काम बुधवारी (दि.4 जानेवारी) करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी औंध, बाणेरसह इतर काही भागाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) बुधवारी बंद राहणार आहे.

तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.5 जानेवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून (Water Supply Department) कळविण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
सकाळ नगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव आणि बाणेर रस्ता, पंचवटी, पाषाण, निम्हण मळाभाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाणाचा काही भाग, चव्हाण नगर, पोलीस वसाहत, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंतचा परिसर, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज परिसर, आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंतचा भाग, बाणेर, बोपोडी, इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत इ. या सर्व भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.


SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook