Ved Box Office Collection : लय भारी! रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ची आठ दिवसांत कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Ved Box Office Collection : लय भारी! रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ची आठ दिवसांत कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

 


Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) बहुचर्चित 'वेड' (Ved) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आठवड्याभरात या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला वर्षाच्या सुरुवातीलाच सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत. 

'वेड' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 2.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 3.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 4.50 कोटी, चौथ्या दिवशी 3.02 कोटी, पाचव्या दिवशी 2.65 कोटी, सहाव्या दिवशी 2.55 कोटी, सातव्या दिवशी 2.45 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 20 कोटी 67 लाखांचा गल्ला जमवला आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... 

(Ved Box Office Collection) 

पहिला दिवस - 2.25 कोटी

दुसरा दिवस - 3.25 कोटी

तिसरा दिवस - 4.50 कोटी

चौथा दिवस - 3.02 कोटी

पाचवा दिवस - 2.65 कोटी

सहावा दिवस - 2.55 कोटी

सातवा दिवस - 2.45 कोटी

एकूण कमाई - 20.67 कोटी

Taranadarsh


तगडी स्टारकास्ट असलेला 'वेड'


रितेश-जिनिलियासह 'वेड' या सिनेमात अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे आणि जिया शंकर हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची (Salman Khan) झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 


'वेड' या सिनेमाद्वारे जिनिलिया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. तर रितेश देशमुखने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रितेश-जिनिलियादेखील आपल्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.


SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook