पुणे – गेल्या एक महिन्याहून अधिक काळ कोरोना हा भारतासह जगभरात हाहाकार माजवत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरु आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात महाराष्ट्र राज्यातील बाधितांचा आकडा हा जास्त असून दिवसेंदिवस चिंतेची बाब आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाने देखील पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढ ही देशभराच्या इतर भागांपेक्षा अधिक व गंभीर असल्याचे म्हटले होते.
सद्या पुणे शहरातील बहुतांश भाग सील आहे. यातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज ट्विट करून माहिती दिली आहे कि, पुण्यातील काही भागात उद्यापासून केवळ दूध आणि मेडिकल सेवा सुरू राहील. कोरोना प्रादुर्भाव अधिक असलेल्या भागात उद्यापासून तीन दिवस किराणा, भाजीपाला, फळे, चिकन, मटण, अंडी विक्री बंद राहणार राहणार असून दूध विक्री स.१० ते दु.१२ सुरु असेल तर घरोघरी दूध विक्रीसाठी स. ६ ते १० वेळ असेल. तसेच त्यांनी पोलीस ठाण्यांची यादी देखील जाहीर केली असून, त्या ठाण्यातील हद्दीतील भागाला असलेले बंधन यांची विभागणी केली आहे.
जाणून घ्या या भागांबद्दल-
पूर्ण हद्दीत बंधने असलेले ठाणे-
१)समर्थ,
२)खडक,
३)फरासखाना
काही भागात बंधने असलेली ठाणे
१) स्वारगेट पोलीस ठाणे अंतर्गत – गुलटेकडी, महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी.
२) लष्कर हद्दीतील भाग – नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मशीद जवळचा परिसर, भीमपुरा लेन, बाबजान दर्गा/ क्वार्टर गेट, शिवाजी मार्केट/सरबतवाला रोड, शीतळादेवी मंदिर रोड.
३) बंडगार्डन – ताडीवाला रोड (खासगी रस्ता).
४) सहकारनगर, तळजाई, वसाहत, बालाजीनगर.
५) दत्तवाडी – पर्वती दर्शन.
६) येरवडा पोलीस ठाणे – लक्ष्मी नगर, गाडीतळ, चित्रा चौक परिसर.
७) खडकी पोलीस स्टेशन -पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर, इराणी वस्ती, पाटकर प्लॉट.
या भागात किराणा व भाजीपाला देखील बंद राहणार असून पूर्णपणे प्रतिबंधक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून दूध व औषधे चालू राहणार असून दुधासाठी देखील वेळ ठरवून देण्यात आली आहे.