मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्या दिल्या. तर हा महाराष्ट्र दिन मोठ्या दिमाखात साजरा करायचा होता, मात्र ते शक्य झाले नाही. कोरोनामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र भर उत्सव साजरा करता आला नाही. हरकत नाही या संकटात जे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना आपण आज वंदन करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर राज्यातील जनताही या संकटाला मोठ्या ताकदीने प्रतिकार करत आहे. त्यामुळे आपण या संकटावर मात करू, ठाकरे म्हणाले.
तसेच 3 मेनंतर राज्यात काहीशी मोकळीक देणार आहोत. मात्र रेड झोनमध्ये काही बंधन ही राहतीलचं. आपल्याला धीराने या कोरोनाचा सामना करायचा आहे. त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. डॉक्टर्स आणि नर्स आपले कर्तव्य बजावत आहेत.
खाजगी डॉक्टरांनी देखील पुढे आले पाहिजे. पोलीस यंत्रणा पण सक्षम आहे. नागरिकांनी पण शंका वाटत असेल तर तात्काळ तपासणी करून घ्यावी. कोरोनाला घाबरायचं काहीच कारण नाही. 6 महिन्याच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या आजीने या कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे घाबरू नका पुढे येऊन तपासण्या करून घ्या, असे ठाकरे म्हणाले.
आपण करोना व्हायरसची श्रृंखला तोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. “लॉकडाउनपेक्षा मी थोडा वेगळा शब्द वापरेन जो सिंगापूरच्या पंतप्रधानांनीही वापरला होता सर्किट ब्रेकर्स..अर्थात हे गतिरोधक आहेत. व्हायरसची श्रृंखला तोडण्यासाठी हे गतिरोधक आवश्यक आहेत” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.