कोरोना : BCCI कडून आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

कोरोना : BCCI कडून आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली


दिवसेंदिवस देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली देशाची स्थिती लक्षात घेत अखेर बीसीसीआयने यावर्षी होणारी आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. हा निर्णय आज झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

यावर्षी २९ मार्च पासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा सर्वप्रथम १५ एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात तीन मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आले. त्यामुळे आता २९ मार्च ते २४ मे दरम्यान होणारी ही स्पर्धा आता एप्रिल-मे मध्ये देखील खेळवली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ANI UPDATE


मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर मध्ये होणारा आशिया चषक पुढे ढकलून त्या जागी आयपीएल स्पर्धा घेणार होती. मात्र, पीसीबी अध्यक्षांनी यास नकार दिला. त्यामुळे आता बीसीसीआय कडे कोणता दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आता आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, यंदा ची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook