मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असंतोश व्यक्त केला. तसेच मरकजच्या कार्यक्रमाला परवानगी न दिल्याबाबद्दल महाराष्ट्र पोलिसांचं अभिंनदन केलं पाहिजे’ असं ही त्या वेळेला ते म्हणाले. हा बंद खूप महत्वाचा आहे. गोष्टी गांभीर्याने घ्या, पोलीस यंत्रणेवर ताण येऊन देऊ नका अशी लोकांना विंनती केली आहे.
‘मोदींनी देशाला आशेचे किरण दाखवले असते तर बरं झालं असतं. देश म्हणून आपण कुठे चाललो आहोत याकडे लक्ष द्यायला हवे. आरोग्य विभागाकडे लक्ष न दिल्यामुळे आज गंभीर परिस्थिती आली आहे. तुमची एक चूक महागात पडू शकते. लोक ऐकत नसतील तर लॉकडाउन वाढवावा लागेल असंही ते म्हणाले. कोरोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांची पोलिसांवर हात टाकायची हिंमत होतेच कशी? ‘खरंतर विकृत चाळे करणाऱ्या लोकांना गोळ्या घालून झाडलं पाहिजे, म्हणजे अद्दल घडेल.’ लोकांना परिस्थितीचं गांभीर्य कळतच नाही आहे.’
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची पत्रकार परिषद