अमरावती – शहरात काल एका व्यक्तीचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला. मृत रुग्ण हा ४५ वर्ष वयाचा होता. मात्र मृताला कोरोनाची लागण झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यामुळे त्याला स्वॅब कोरोना तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आला आहे. मृत रुग्णावर न्यूमोनियाच्या कारणास्तव बडनेराच्या पालिका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर प्रकृती खालावल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालतात हलविण्यात आले होते. मात्र आता तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट आला असल्याने अमरावतीत खळबळ उडाली असून अमरावतीत कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह व कोरोनाचा बळी गेला आहे
दिल्ली येथे आयोजित मरकझमधून अमरावती जिल्ह्यात आलेल्यांची अधिकृत २३ जण आहेत. या सर्व जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यापैकी कोणत्याही व्यक्तीत कोरोनाची लक्षणं अद्याप आढळून आलेली नाहीत. दरम्यान, गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती, या मृत व्यक्तीबाबद जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सदर व्यक्ती निमोनियामुळे दगावली असल्याचे स्पष्ट केले.
हा व्यक्ती काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर बडनेरा येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारीच या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालतात हलविण्यात आले होते. निमोनियाचा रुग्ण असणाऱ्या या व्यक्तीचा स्वॅब कोरोना चाचणीसाठी आधीच घेण्यात आला होता. आज सकाळी त्याचा स्वॅबचा चाचणी अहवाल आला असून त्याला कोरोनाची लागण झाली होती. तर तो पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे.