रत्नागिरी: रत्नागिरी सिधुदुर्ग येथील आबा बागायतदार याचा आंबा आता थेट मुबंई, ठाणे, खारघर येथील सोसायटींमध्ये पोहचत असून कृषी विभाग यांनी चांगला संकल्प राबविला आहे. मुंबई, ठाणे, खारघर येथील सोसायटीची आंबासाठी मागणी शेतकऱ्यांकडे नोंदविल्यानंतर शेतकरी गटाचे बँक खाते नंबर सोसायट्यांना दिला जातो व सोसायटी आंब्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतात.
सध्या साडेतीनशे रुपये डझनाने चार डझनाचा एक बॉक्स याप्रमाणे आंब्याची विक्री करण्यात येत असून हा आंबा सद्या किरकोळ विक्री बाजारात सातशे रुपये डझनाला उपलब्ध आहे वाजवी दरामध्ये ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून ओरिजनल हापूस येऊ लागल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आता पर्यत मुबंई ठाणे खारघर येथील १२ सोसायटीने मागणी केली ती जवळपास ५००० आंब्याची होती तर रत्नागिरी येथील ३००० आंबा मागणीनुसार मुंबई येथे शेतकरी वर्गाने गाड्याच्या माध्यमातून पोहचविले आहे अशा पद्धतीने चांगला उपक्रम राबविल्याबद्दल कृषी विभागाचे कौतुक होत आहे.