टीम महाराष्ट्र देशा – आज शहरात बिल्डर, आर्किटेक्ट पुनर्विकासाच्या नावाखाली उंचच उंच उभ्या झोपड्याच उभारत आहेत. ज्यात नागरिकांना मोकळं वातावरण मिळत नाही, ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या वसल्या आहेत तिथे पुनर्विकासातून विकासकांनी प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे मत प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केलं आहे.
एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. आज मुंबईत कोरोनाची जी भयानक परिस्थिती निर्माण झालीय त्याला या झोपडपट्टया जबाबदार असल्याचंही ते म्हणाले.
करोनामुळे कमी किमती निर्माण झालेल्या झोपडपट्ट्यांची खरी बाजू आता समोर आली आहे. धारावी सारख्या देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत जवळपास १० लाख झोपड्या आहेत. याठिकाणी जवळपास पंधरा लाखाच्या आसपास लोक राहतात. आता या धारावीत कोरोनाचे हॉटस्पॉट निर्माण झाल्याने अधिकच धोका निर्माण झाला आहे. आर्किटेक्ट आणि विकासकांच्या काही सामाजिक जबाबदारी आहे की नाही? असा सवालही रतन टाटा यांनी उपस्थित केला आहे.
वाजवी दरात घरं उपलब्ध न करणारे बिल्डर आणि आर्किटेक्ट विकासाच्या नावाखाली मुंबईत उचंचउचं झोपडपट्टी उभारत आहेत. ज्या ठिकाणी लोकांना योग्य वातावरण मिळत नाही. त्यामुळे शहराचे नियोजन बिघडले आहे. शहर बांधकाम व्यावसायिकांना शहरांमध्ये अशा झोपडपट्ट्या तयार करताना लाज वाटायला हवी. या परिस्थितीला इथले बिल्डर आणि आर्किटेक्ट जबाबदार आहेत, असे परखड मत उद्योगपती रतन टाटा यांनी मांडले.
हेही पहा –