महाराष्ट्र देशा टीम : लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्व टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सीरिज यासारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे चित्रीकरण बंद आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण जगात एकही नवा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. परिणामी चित्रपटगृह देखील ओसाड पडली आहेत. लॉकडाउनमुळे सिनेउद्योग तर पार ठप्पच झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
‘द बॅटमॅन’ हा एक सुपरहिरोपट आहे. येत्या २५ जूनला हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे आता थेट पुढच्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. ‘बॅटमॅन’ हा सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या काल्पनिक व्यक्तिरेखेला यंदाच्या वर्षी तब्बल ८० वर्ष पुर्ण झाली.
या निमित्ताने वॉर्नर ब्रदर्स प्रोडक्शन कंपनी चाहत्यांसाठी काहीतरही धमाकेदार करण्याचा प्रयत्न करणार होती. त्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. बॅटमॅनसोबतच डीसी युनिव्हर्सचे ‘वंडर वुमन १९८४’, ‘फलॅश पॉईंट’, ‘ब्लॅक अॅडम’ आणि ‘शेजॅम २’ हे चित्रपट देखील पुढे ढकलण्यात आले आहेत.