पुणे- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये कोरोनाचा एक पॉसिटीव्ह रुग्ण सापडला आहे. त्यानंतर खडकी परिसर पूर्णपणे लॉकडॉउन करण्यात आले आहे.
या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराद्वारे खडकी बाजाराचे चित्रीकरण करण्यात आले आहे. घराबाहेर नागरिक आढळल्यास त्यांच्यावर संचारबंदी कायद्याचा भंग केल्याची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती खडकी पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील मध्य भाग पालिकेने सील केले आहे. संचारबंदी कायद्याचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
Tags:
Pune