पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांनी शहरात पाच ठिकाणी कर्फ्यू जाहीर केला आहे. आज सायंकाळी सात वाजल्यापासून 14 एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या पाचही भागात नागरिकांच्या संचाराला पूर्णपणे बंदी असेल. मंगळवार पेठ, रविवार पेठ, गाडीतळ, स्वारगेट आणि कोंढवा या 5 परिसरात हा कर्फ्यू असेल.
तसेच पुण्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी फक्त जीवनावश्यक घटक वगळता या भागातील दुकाने फक्त दोन तास (सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यतच) सुरु राहतील. गर्दी वाढली तर दुकाने बंद करण्यात येतील. महत्त्वाचं म्हणजे दुकानं कधी उघडी ठेवायची याची वेळ पोलीस ठरवणार आहेत.
जीवनावश्यक घटकामध्ये मेडिकल दुकाने व रूग्णालये याचा समावेश आहे तर इतर घटकामध्ये भाजीपाल, किराणा दुकाने यांचा समावेश आहे. त्यामुळे फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक गरज पडल्यास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकतील.
Tags:
Pune