मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आनंद परांजपे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी यावर मात केली असल्याचं वृत्त समोर आले आहे. आनंद परांजपे हे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते.
मात्र आनंद परांजपे यांनी वेळीच स्वतःला क्वारांटाईन करत चाचणी केली. यावेळी त्यांच्या पत्नीनेही चाचणी करून घेतली. आता दोघेही सुखरूप आणि ठणठणीत आहेत. त्यामुळे मंगळवारी रात्री आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना होरायझन रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला.
तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धडाडीचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र ते ही आता पूर्णपणे बरे झाले आहेत. जितेंद्र आव्हाड याची प्रकृती आता उत्तम आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते.
दरम्यान, देशात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे.