भारतीय नौदलातही करोनाची घुसखोरी

भारतीय नौदलातही करोनाची घुसखोरी


भारतीय नौदलाच्या मुंबईतील तळावर कार्यरत असणाऱ्या किमान 26 जवानांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे भारतीय लष्करी संस्थांमधील चिंता वाढली आहे. भारतीय सैन्याच्या कोणत्याही शाखेत अशा प्रकारचा करोना फैलाव होण्याची ही पहिलीच घटना आहे. भारतीय लष्करात आता पर्यंत आठ करोनाबाधित सापडले होते. मात्र, त्या सर्व व्यक्तीगत केसेस होत्या.

ही घटना मात्र एकाच ठिकाणी घडली आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय योजावे लागणार आहेत. त्याच बरोबर जवानांचे मोठ्या प्रमाणात चाचणी आणि विलगीकरण करावे लागणार आहे. हे सर्व बाधित आयएनएस आंग्रेवर कार्यरत होते. हे जाहज लॉकडाऊन करण्यात आले असून त्यातील सर्व खलाशांवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू अहोत.

या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांचा शोध घेण्यात येत असून त्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील 25 कर्मचारी हे आयएनएस आंग्रेच्या कर्मचाऱ्यासाठी असणाऱ्या एकाच खोलीत एकत्र रहात होते. तर अन्य एक सहकारी मात्र त्याच्या आईसह स्वत:च्या घरात रहात होता. त्याच्या आईचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

या घटनेनंतर नौदलाने त्यांच्या निवासी विभागातील सर्व लोकांच्या व्यापक चाचण्या घेण्यास सुरवात केली आहे. तसेच तो भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. आयसीएमआरच्या आचार संहितेनुसार आयएनएस आंग्रे हे जहाज लॉकडाऊन केल्याचे नौदलाच्या सुत्रांनी सांगितले.

या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ते सात एप्रिलला बाधित झाल्याचे निष्पन्न झालेल्या सहकाऱ्याच्या संपर्कात आल्याने त्यांना करोनाची बाधा झाली असल्याचे नौदलाने यापुर्वीच्या पत्रकात म्हटले होते.

जगभरातील अनेक देशांच्या नौदलांना करोनाने ग्रासले आहे. अमेरिकेच्या दीओडोर रुझवेल्ट या विमानवाहू युध्दनौकेवर 500 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. फ्रान्सच्या नौदलातही करोना बाधित आढळले अहेत.


SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook