सावधान! खडकीत दाखल झाला कोरोना

सावधान! खडकीत दाखल झाला कोरोना

पिंपरी-चिंचवड आत्महत्या 6 कोरेनाची रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’, किंवा एखाद्या खडकीत व्यक्ती


पुणे/पिंपरी : पिंपरी चिंचवडकरां सोबत खडकीकरांची चिंता वाढणारी एक बातमी समोर आली आहे. शहरात कोरोनाचा धोका वाढला असून आज एकाच दिवशी नवीन 6 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. यामध्ये एक खडकी येथील निवासी आहे.त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या आता वाढली आहे.
चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाबाधीत तब्बल 6 रुग्ण आढळून आले. त्यातील 4 जण दिल्लीतील तबलिकी जमात संमेलनात सहभागी झाले होते, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रात्री उशीरा दिली.यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 झाली आहे.आज आढळून आलेल्या 6 कोरोना रुग्णांपैकी 4 जण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, 1 रुग्ण डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार घेत आहे. तो रुग्ण खडकी काँटोंमेन्ट बोर्ड हद्दीतील निवासी आहे. तर, 1 रुग्ण पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे खडकीकरांनी आता सावध होणे गरजेचे आहे. हे रुग्ण पॉसिटिव्ह असल्याकारणाने या रुग्णांचा मधल्या काळात कोणाकोणाशी संपर्क आला याची माहिती घेतली जाणार आहे. म्हणूनच संसर्ग टाळण्यासाठी संपर्क टाळा.

तसेच दुसरीकडे पुण्यात गेल्या 24 तासांत करोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असून त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा आणि एका 48 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे शहरातील मृतांची संख्या चारवर पोहोचली असून राज्यातील मृतांचा आकडा 34वर पोहोचला आहे. पुण्यात काल रात्री उशिरा एका 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा स्वॅब रिपोर्ट रात्री उशिरा आल्यानंतर त्याला करोनाची लागण झाल्याचं निदान झालं, असं सूत्रांनी सांगितलं.ससून रुग्णालयातच आज एका 60 वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला आहे. ही महिला काही दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात अली होती तिची चाचणी घेतली असता ती निगेटिव्ह आल्याने तिला नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, घरी आल्यानंतर ती पुन्हा आजारी पडली होती. तिला उशिरा ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिचा स्वब चाचणीला पाठविला असता तिचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे निदान झाले असल्याचं पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook