मुंबई : कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. तसेच या कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन सुरु आहे. यामुळे लोकांमध्ये काहीसं चिंतेच वातावरण आहे. २१ दिवसांचा लॉकडाउन ३ मे पर्यंत लांबला. तसेच कोरोनाला हरवण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील सतत फेसबुक द्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहे. राज्यातील तसेच देशातील कोरोनाबाबत आढावा घेत आहे. नागरिकांना धीर देत आहेत. यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
याच पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या कृतीनं भारावून गेला आहे. याबाबत त्याने एक ट्विट केलं आहे. ‘आपण सगळेजण एका अभूतपूर्व संकटाला तोंड देत आहोत. करोना विषाणूबरोबरच आपण भीती, चिंता आणि अनिश्चिततेविरुद्ध देखील लढा देत आहोत,’ असं त्याने म्हटले आहे.
दरम्यान, ‘या कठीण काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत स्पष्टपणे आणि जिव्हाळ्यानं आपल्याशी नियमिपणे संवाद साधत आहेत. त्यांचं यासाठी आपण कौतुक केलं पाहिजे,’ असं म्हणत रितेश देखमुख यांन मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.