चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला


मुंबई :  राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरुन लढत आहेत. खाजगी व्यक्ती, स्वयंसेवी संस्थाही या लढाईत योगदान देत आहेत. ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ च्या माध्यमातून या लढाईसाठी आर्थिक बळ एकत्रित केले जात आहे. या निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक जाणीव, कर्तव्याच्या भावनेतून राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मे 2020 च्या वेतनातून या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आदेश काढण्यात यावेत, अशी विनंती कर्मचारी महासंघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याची माहिती ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी आज दिली.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook