‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीने ती कुणाच्या प्रेमात पडली आहे हे एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. गेली अनेक महिने ती कुणाच्या प्रेमात आहे हे गुलदस्त्यात ठेवलं होतं पण ते ही सोनालीने स्वत:च जाहीर केलं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवसाला तिचा साखरपुडा झाला असल्याची गुड न्यूज शेयर केली आहे. याच वर्षी २ फेब्रुवारी रोजी दुबईत सोनालीने बॉयफ्रेंड बिझनेसमन कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला आहे. शिवाय या साखरपुड्याचे फोटोही तिने चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने सोनालीने ही आनंदाची बातमी सोशल मिडीयावर शेयर केली असुन तिने तिच्या चाहत्यांसाठी हे पोस्ट केले आहेत.
Tags:
Entertainment