1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना

1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना


मी उद्योजक होणार
 -----------------------------------------

1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना

 महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय ,
 जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व  जिल्ह्यासाठी लागू)

 राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी

    
 योजनेचे नाव ::::--
 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}
    

 योजने विषयी थोडेसे

 योजनेचे संकेतस्थळ :-

  योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र

  योजनेचे निकष :-
 1) वयोमर्यादा 18 ते 45
 (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )
 2) शैक्षणिक पात्रता
 (i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास
 (ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास
 3)  उत्पादन उद्योग :-  ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख
 4)  सेवा  उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख

 प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे
 (i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%
  (iI) इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त  20% ( iii )खेळते भांडवल :- जास्तीत जास्त  30%

 5) स्वगुंतवणूक :- 5 ते 10%

 6) अनुदान मर्यादा :- 15 ते 35 %
 7) *सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे तसेच मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणे बंधनकारक आहे*

 8) पात्र मालकी घटक :-  वैयक्तिक , भागीदारी, बचत गट

 9) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित  कागदपत्र

 1)पासपोर्ट साइज फोटो
 2) आधार कार्ड
 3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट
 4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )
 5)हमीपत्र  (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल
 6)प्रकल्प अहवाल
 7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर )
 8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग )
 9) REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र
 10) लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर )
 11) पार्टनरशिप उद्योग असेल तर i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
 Ii)अधिकार पत्र ,घटना

 टीप :- वरील कागदपत्रामधील अनुक्रमांक  1 ते 4 हे 300 KB पर्यंत व  अ क्र 5 आणि 6 हे 1 MB  पर्यंत असावे .

 वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ

 सदर संकेत स्थळाला भेट दयावी व आजच संकेतस्थळावर अर्ज दाखल करावेत
    
 ▪5% - 10% स्वतःचे भांडवल
 ▪60% - 80% बँकेचे कर्ज
 ▪30% सर्व महिलांसाठी अनुदान राखीव
 ▪20% SC/ST साठी अनुदान राखीव
 ▪*एक कुटुंब एक लाभार्थी*

 *माहितीसाठी काही उत्पादन उद्योग/सेवा उद्योगाची यादी*
 

 1. थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे
 2. फॅब्रिक्स उत्पादन
 3. लॉन्ड्री
 4. बारबर
 5. प्लंबिंग
 6. डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती
 7. स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस
 8. बॅटरी चार्जिंग
 9. आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग
 10 सायकल दुरुस्तीची दुकाने
 11 बॅन्ड पथक
 12 मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
 13. इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
 14. ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग
 15 काटेरी तारांचे  उत्पादन
 16 इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन
 17 स्क्रू उत्पादन
 18. ENGG. वर्कशॉप
 19. स्टोरेज बॅटरी उत्पादन
 20. जर्मन भांडी उत्पादन
 21. रेडिओ उत्पादन
 22. व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन
 23 कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे
 24 ट्रंक आणि पेटी उत्पादन
 25. ट्रान्सफॉर्मर/ELCT. मोटार पंप/जनरेटर उत्पादन
 26. कॉम्प्यूटर असेंम्बली
 27 वेल्डिंग वर्क
 28. ​​वजन काटा उत्पादन
 29. सिमेंट प्रॉडक्ट
 30  विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे
 31 मशीनरीचे सुटे भाग उत्पादन
 32. मिक्सर ग्रिंडर आणि इतर घरगुती वस्तू  बनविणे.
 33. प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग
 34.  बॅग उत्पादन
 35. मंडप डेकोरेशन
 36. गादी कारखाना
 37. कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग
 38 झेरॉक्स सेंटर
 39 चहा स्टॉल
 40 मिठाईचे उत्पादन
 41. होजीअरी उत्पादन
 42. रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन
 43.  खेळणी आणि बाहुली बनविणे
 44. फोटोग्राफी
 45. डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती
 46. मोटार रिविंडिंग
 47. वायर नेट बनविण
 48. हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर
 49. पेपर पिन उत्पादन
 50. सजावटीच्या बल्बांचे उत्पादन
 51. हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने
 52 केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र
 53. पब्लिक ट्रान्सपोर्ट/रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस
 54 सिल्क साड्यांचे उत्पादन
 55 रसवंती
 56 मॅट बनविणे
 57. फायबर आयटम उत्पादन
 58 पिठाची गिरणी
 59 कप बनविणे
 60. वूड वर्क
 61. स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर
 62. जिम सर्विसेस
 63 आयुर्वेदिक औषध उत्पादन
 64 फोटो फ्रेम
 65. पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक
 66 खवा व चक्का युनिट
 67 गुळ तयार करणे
 69. फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया
 70 घाणी तेल उद्योग
 71. कॅटल फीड
 72 दाळ मिल
 73. राईस मिल
 74. कॅन्डल उत्पादन
 75 तेलउत्पादन
 76 शैम्पू उत्पादन
 77. केसांच्या तेलाची निर्मिती
 78 पापड मसाला उदयोग
 79. बर्फ/ICE कॅंडीचे उत्पादन
 80 बेकरी प्रॉडक्ट्स
 81. पोहा उत्पादन
 82  बेदाना/मनुका उद्योग
 83. सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क)
 84 चांदीचे काम
 85 स्टोन क्रशर  व्यापार
 86 स्टोन कटिंग पॉलिशिंग
 87 मिरची कांडप

  सदर योजना अंतर्गत  आपणास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करता येईल .....
 नवीन उद्योग उभारणीसाठी आपणास हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
 *अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा
 जिल्हा उद्योग केंद्र (DIC) .... महाराष्ट्र राज्य.
SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook