एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि.१५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यामध्ये 33 टक्के ते 100 टक्के पर्यंत सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या  ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याची योजना एसटीने  यापूर्वीच सुरू केलेली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला दिनांक 15 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.  त्यामुळे  ज्या भागात एसटी बस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, असेही श्री. परब यांनी सांगितले.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook