गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यातच राज्यात दुसरीवेळ बऱ्या होणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक आकडेवारी आज समोर आली आहे. आज राज्यभरात तब्बल ५ हजार ७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर याआधीही म्हणजेच 29 मे रोजी ८ हजार ३८१ जणांना एकाच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला होता. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. ५ हजार ७१ रुग्णांपैकी एकट्या मुंबई शहरातून सर्वाधिक म्हणजे ४ हजार २४२ एवढ्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात ५६ हजार ४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहितीदेखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
याआधी २९ मे रोजी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या समोर आली होती. तब्बल ८ हजार ३८१ रुग्णांना त्यावेळी घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही दुसरी वेळ आहे. या सर्वांमुळे राज्यातला बरा होणाऱ्या रुग्णांचा दर 47.2 इतका झला आहे. तर मृत्यूदर 3.2 इतका आहे.
आज सोडण्यात आलेले रुग्ण प्रभागानुसार…
मुंबई मंडळ ४२४२
पुणे मंडळ ५६८
नाशिक मंडळ १००
औरंगाबाद मंडळ ७५
कोल्हापूर मंडळ २४
लातूर मंडळ ११
अकोला मंडळ २२
नागपूर मंडळ २९