दर वर्षी फेब्रुवारी महिना उजाडला की संपूर्ण जगाच्या सिनेरसिकांचं लक्ष लागलेलं असतं, ते जगप्रसिद्ध अशा ऑस्कर पुरस्कारांवर. दर वर्षी हे हॉलिवूडचे पुरस्कार फेब्रुवारी महिन्यात पार पडतात आणि त्यासाठी एक काटेकोर नियमावली ठरलेली असते. पुढच्या वर्षी हा सोहळा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडणार असल्याचं जाहीर झालं होतं. तसंच यंदा या ऑस्करच्या निमयांमध्ये बरेच बदल होणार असल्याचंसुद्धा जाहीर करण्यात आलं होतं. आता या पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्याची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीचा सामना करत आहे. त्यामुळे संपूर्ण जगात बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनदेखील पाळला जात आहे. या कारणानेच चित्रपटगृह बंद आहेत आणि त्यामुळे सिनेमांच्या रिलीजवर परिणाम होताना दिसत आहे. अनेक सिनेमाचं रिलीज रखडलं आहे तर काही सिनेमे थेट ओटीटी रिलीजची वाट धरतच आहेत. या सगळ्याचा विचार करत पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कारांच्या इतिहासात ऑनलाईन रिलीज होणाऱ्या सिनेमांचादेखील काही नियमांच्या बंधनात राहुन विचार केला जाईल, असं जाहीर करण्यात आलं होतं. आता तर सिनेमाच्या रखडलेल्या रिलीजचा विचार करत हा पुरस्कार सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे. द अॅकेडमीने आता नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. ऑस्कर पुरस्कारांच्या ऑफिशियल साईटवर आता हा सोहळा २८ फेब्रुवारी २०२१ नाही तर २५ एप्रिल २०२१ रोजी पार पडणार असल्याचं जाहीर झालं आहे.
यासोबतंच या सोहळ्या संबंधीत अनेक महत्त्वाच्या तारखादेखील जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढच्या वर्षी या पुरस्कारांचं ९३ वं वर्ष असून या पुरस्कारांसाठी विचारात घेतलेले सिनेमांच्या रिलीजची तारिख १ जानेवारी २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यानची असेल. तसंच कोणते सिनेमे शॉर्टलिस्ट झाले आहेत ते ९ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केलं जाणार आहे. ऑस्कर २०२१ ची नॉमिनेशन्स १५ मार्च २०२१ रोजी जाहीर केली जातील. मुख्य सहळा २५ एप्रिल २०२१ रोजी पार पडले आणि ऑस्कर म्युझियम ३० एप्रिल २०२१ पासून उघडं करण्यात येईल, असं जाहीर झालं आहे.

Tags:
Entertainment