हॉलिवूड सुपस्टार टॉम हॅन्क्स यांच्या गाजलेल्या हॉलिवूड सिनेमा फॉरेस्ट गंम्प चा अधिकृत रिमेक असलेला बॉलिवूड सिनेमा लाल सिंह चड्ढा मध्यंतरी जाहीर झालं. परफेक्शनिस्ट आमिर खानने त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत गेल्या वर्षी हा सिनेमा जाहीर केला आणि तेव्हापासून सिनेमाची उत्सुकता प्रचंड आहे हे पहायला मिळालं. सिनेमात आमिरच्या अपोझिट करिना कपूर खान झळकणार हे देखील जाहीर झालं. सिनेमा आमिरसाठी लकी असलेल्या क्रिसमसच्या मुहुर्तावर 2021च्या डिसेबरमध्ये भेटीला येणार हे देखील जाहीर झालं होतं.
लॉकडाऊन घोषीत व्हायच्या आधी या सिनेमाचं शूट जोरदार सुरू होतं आणि करिना-आमिर त्यासाठी अम्रितसरमध्ये शूट करताना दिसले. या शूट दरम्यानचे आमिर करिनाचे सिनेमातल्या लूकमधले फोटो व्हायरल देखील झाले होते. मात्र लॉकडाऊनमुळे शूट थांबलं होतं. आता मात्र या सिनेमाचं शूट लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या 15 जुलैपासून या सिनेमाचं शूट पुन्हा एकदा सुरू होणार असून त्यासाठी करिना आणि आमिर पुन्हा सज्ज झाले आहेत अशी माहिती हाती लागली आहे.
हा सिनेमा येत्या डिसेबंरमध्ये रिलीजसाठी सज्ज आहे. सध्या सिनेमागृहं बंद असली तरी डिसेंबरपर्यंत गोष्टी थोड्या निवळतील आणि सिनेमागृह सुरू होऊ शकतील असा अंदाज सध्या तरी वर्तवला जात आहे. त्यामुळे या दृष्टीकोणातून या सिनेमाचं शूट बहुदा सुरू होणार आहे जेणेकरून सिनेमा डिसेंबरची रिलीज डेट गाठू शकणार आहे. या शूट बाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल असा देखील अंदाज आहे.