नवी दिल्ली : भारत आणि चीन दरम्यान मोठा संघर्ष सुरु आहे. भारत आणि चीन नियंत्रण रेषेवरील (एलएसी) सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीनच्या टिकटॉक आणि झूमसह जोडलेले 52 मोबाईल अॅप्स ब्लॉक करण्याची तसंच लोकांना त्याचा वापर थांबविण्याचा सल्ला देण्याची शिफारस केली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने चिनी अॅप्स असुरक्षित असून भारताबाहेर भव्य डेटा पाठवत असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. यामुळे, भारतावर सायबर हल्ला देखील होण्याची शक्यता असल्याचे गुप्तहेर यंत्रणांनी म्हटलं आहे.
Tags:
India