बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली. या घटनेने बॉलीवुड शोककळा पसरली आहे.
पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांतसिंग राजपूत प्रसिद्धीच्या झोतात आला होतात.त्यांनतर त्याने ‘क्या पो छे!’ या चित्रपटात काम केले. यामध्ये तो मुख्य अभिनेता होता.तसेच महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातही काम केलं होतं.
आपल्या करीयरच्या उत्तुंग शिखरावर असताना त्याने हा निर्णय का घेतला हा मोठा प्रश्न आहे. मात्र सुशांत च्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडने एक तरुण अभिनेता गमावला आहे.
Tags:
Entertainment