पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपींग , रॉ वॉटर पंपींग , वडगाव जलकेंद्र , एसएनडीटी , वारजे जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत , पंपींग विषयक , स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत . यामुळे येत्या गुरुवारी ( दि .11 ) रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे . तसेच शुक्रवारी ( दि .12 ) शहरात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे . गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : शहरातील सर्व पेठा , दत्तवाडी , राजेंद्रनगर , लोकमान्य नगर , डेक्कन जिमखाना , शिवाजीनगर , स्वारगेट , पर्वती दर्शन , पर्वती गाव , मुकुंदनगर , सहकारनगर , एसएनडीटी परिसर , एरंडवणा , संपूर्ण कोथरूड , डहाणूकर कॉलनी , कर्वेनगर , लॉ कॉलेज रोड , सातारा रस्ता परिसर , पद्मावती , बिबवेवाडी , तळजाई , कात्रज , धनकवडी , इंदिरानगर , कर्वे रस्ता , सेमिनरी झोनवरील मिठानगर , शिवनेरीनगर , भाग्योदयनगर , ज्ञानेश्वरनगर , साईबाबानगर , सर्वे क्र ४२,४६ कोंढवा खुर्द , पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र . वडगाव जलकेंद्र : हिंगणे , आनंदनगर , वडगाव , धायरी , आंबेगाव पठार , दत्तनगर , धनकवडी , कात्रज , भारती विद्यापीठ , कोंढवा बुद्रुक इत्यादी .
चतुःशृंगी , एसएनडीटी , वारजे जलकेंद्र : पाषाण , औंध , बोपोडी , खडकी , चतुःशृंगी परिसर , बावधन , बाणेर , चांदणी चौक , महात्मा सोसायटी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर , वारजे माळवाडी , रामनगर , अहिरेगाव , पॉप्युलरनगर , अतुलनगर , शाहू कॉलनी , सूस , सुतारवाडी , भूगाव रस्ता , गोखलेनगर , जनवाडी , रेंजहिल्स , किष्किंधानगर , रामबाग कॉलनी , डावी - उजवी भुसारी कॉलनी , धनंजय सोसायटी , एकलव्य कॉलेज , महात्मा सोसायटी , गुरुगणेशनगर . लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग , पुणे स्टेशन परिसर , मुळा रस्ता , कोरेगाव पार्क , ताडीवाला रस्ता , रेसकोर्स परिसर , वानवडी , हडपसर , महंमदवाडी , काळेपडळ , येरवडा परिसर , वडगाव शेरी , चंदननगर , खराडी , सोलापूर रस्ता , टिंगरेनगर , कळस , धानोरी , लोहगाव , विश्रांतवाडी , विमाननगर , मुंढवा , विश्रांतवाडी , नगर रस्ता , कल्याणीनगर , महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी , गोंधळेनगर , सातववाडी . नवीन होळकर पंपिंग : विद्यानगर , टिंगरेनगर , कळस , धानोरी , लोहगाव , विश्रांतवाडी , विमाननगर , नगर रोड परिसर .
Tags:
Maharashtra