१.गणेशोत्सव मंडळांनी महापलिका तसेच स्थानिक प्रशासनाच्या धोरणानूसार यशोचित पवानगी घ्यावी
२.महापालिका तसेच स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या मंडपविषयक धोरणाशी सुसंगत मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत. मंडपाची सजावट करताना भपकेबाजी करु नये.
३.श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी ४ फूट तर घरगुतीसाठी २ फूट उंच असावी.
४. यावर्षी पारंपरिक मूर्ती ऐवजी शक्यतो घरातील संगमरवरी किंवा धातूच्या मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती पर्यावरणपूरक किंवा शाडूची असल्यास घरच्या घरी विसर्जन करावे. विसर्जन शक्य असल्यास पुढे ढकलावे, म्हणजे माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा पुढच्या वर्षी गणेशविसर्जनावेळी.
५.उत्सवासाठी वर्गणी स्वेच्छेने दिल्यासच तिचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्यावर भर द्यावा.
६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम किंवा शिबीर उदा. रक्तदान शिबीर आयोजित करावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार व त्याबाबत जनजागृती करण्यात यावी.
७. आरती, भजन, कीर्तन यांचे आयोजन करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनीप्रदुषण विषयक नियमांचे पालन करावे.
८. श्रीगणेशाची दर्शन व्यवस्था ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य द्यावे, उदा. वेबसाईट, फेसबुक लाईव्ह, केबल नेटवर्क इ.
९.गणपती मंडपात निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष दर्शनाला येऊ इच्छिणाऱ्या भाविकांच्या शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याकडे लक्ष द्यावे.
ANI UPDATE