अयोध्येत बौद्ध अवशेषांचा जतन करून तिथे भव्य बुद्धविहार हि व्हाव
आयोध्येत सापडलेल्या बौद्ध कालीन अवशेषांचे जतन करण्यात यावे व त्या साठी एक बुध्दविहार साकारण्यासाठी सर्व बौद्ध समाजाने, नेत्यांनी एकत्र यावे - महागायक आनंद शिंदे
________________________
अयोध्येतील प्राचीन अवशेष सम्राट अशोक काळातीलच
आयोध्येत बुध्दविहार निर्माण व्हावे यासाठी देशातील सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र होऊन लढा देणे गरजेचे असल्याचे अवाहन राष्ट्रीय महागायक आनंद शिंदे यांनी केले आहे.
राम मंदिराच्या उभारणीसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना आढळून आलेल्या प्राचीन मूर्ती व अवशेषांवरून ही बुद्धभूमी असल्याचे स्पष्ट होते. जमीन सपाटीकरणात जे प्राचीन अवशेष सापडले ते सम्राट अशोकाच्या शासन काळातील आहेत. काही लोकांनी रामजन्मभूमी परिसराचे निष्पक्ष उत्खनन करण्यात यावे, अशी मागणी यूनेस्को या जागतिक पातळीवरील संघटनेकडे केली आहे. देशातील अनेक बडे आंबेडकरी नेते हे वेगवेगळ्या पक्ष,संघटना यामध्ये विभागले आहेत परंतू अशा वेळी सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन आयोध्येत एक उत्कृष्ट बुध्दविहार व बौध्दअवशेष,मुर्त्यांचे जतन करण्यासाठी संग्राहलय उभे करावे अशी प्रमूख मागणी घेऊन सर्व आंबेडकरी नेत्यांनी,भिमबांधवांनी व्यापक लढा उभा करुन आपला अधिकार मिळवला पाहीजे
अयोध्येत सापडलेले प्राचीन अवशेष बौद्ध धम्माशी संबंधित असल्याचा दावा ऑल इंडिया मिल्ली काऊन्सिलचे सरचिटणीस कालिक अहमदखान यांनीसुद्धा केला आहे.
दाल में कुछ तो काला है...