कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठीआनंदाची वार्ता आहे. शहरात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या चाकरमान्यांना आता एसटीने कोकणात जाता येणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर असंख्य चाकरमानी नोकरीधंदा सोडून मुंबईतच अडकले होते. कोरोना संसर्गामुळे त्यांना आपल्या मूळगावी परतता येत नव्हते. मात्र आता गणेशोत्सव हा सन ऑगस्टमध्ये येत आहे. या सणाला प्रत्येक चाकरमानी हा गावी जातोच. त्यामुळे या चाकरमान्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी, त्यांना एसटीने प्रवास करता येणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आश्वासन दिले आहे. नुकत्याच आमदारांसोबत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोकणात चाकरमान्यांना सुखरूप पाठविण्यात येणार आहे.त्यासाठी एसटीची मदत घ्यावी लागणार असून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. तसेच गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांवरून राजकारण नको असे विधान करून परब यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.