कोरोनामुक्त झाला म्हणून डीजे लाऊन केलं स्वागत,मित्रमंडळी अडकले कायद्याच्या कचाट्यात

कोरोनामुक्त झाला म्हणून डीजे लाऊन केलं स्वागत,मित्रमंडळी अडकले कायद्याच्या कचाट्यात


पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गातून रुग्ण बरा होऊन घरी आल्यावर सार्वजनिक ठिकाणी लोक जमा करून डीजे लाऊन लोणी काळभोर येथे जल्लोष साजरा केल्याची बाब आता समोर येत आहे. या कृतीने हा संसर्गजन्य रोग पसरू शकतो याची जाणीव असताना देखील नातेवाईक व मित्रमंडळी असे सुमारे १५ लोक जमा करून साउंड सिस्टीम लाऊन विनामास्क नृत्य करून त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल केली गेली.

या कृत्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव या अनुषंगाने जरी केलेल्या आदेशाचा भांग म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश उंबरदेव करचे यांनी फिर्यादी वरून उमेश उर्फ टक्या निवृत्ती राखपसरे (रा.बेटवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) याच्यासमवेत त्याचे स्वागत करणाऱ्या पंधराहून अधिक नातेवाईक व मित्रांच्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती कायदा व कोविड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ साथीचा रोग प्रतिबंधक १८९७ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य उमेश राखपसरे याना कोरोनाची लागण झाल्याने १० दिवसांपासून हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook