नवी दिल्ली – बिअरच्या चाहत्यांसाठी धक्कादायक अशी बातमी सद्या व्हायरल होत आहे.बडवायजर या प्रसिद्ध बिअर कंपनीचे कर्मचारी गेली 12 वर्ष बिअरमध्ये मूत्रविसर्जन करत असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बातमी कळताचं मद्यप्रेमींनी रोष व्यक्त केला. तर काहींनी सोशल मीडियावर मजेशीर मीम्स शेअर करत याची मजा घेतील.
बिअरचा साठा करण्यासाठी कंपनीतील टँकमध्ये मी तब्बल 12 वर्ष बिनधास्त लघवी करत होतो. बिअर बनवणाऱ्या एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कर्मचाऱ्याने केलेला हा खुलासा पाहून मद्यप्रेमींमध्ये खळबळ माजली आहे. ही बातमी बडवायजर या प्रसिद्ध बिअर कंपनीबाबत असल्याने सोशल मीडियात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेक बिअर प्रेमींनी कंपनीविरोधात सोशल मीडियात आक्रमक लिखानही केलं. तर काहींनी मजेशीर मीम्स शेअर करत याची मजा घेतली.
मात्र या बातमीमागचं सत्य ABP माझाने समोर आणलं आहे.पोर्ट कॉलिन्स शहरातील बिअरची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराने धक्कादायक खुलासा केल्याची बातमी व्हायरल झाली आहे. या बातमीनंतर अनेक मद्यप्रेमींनी संताप व्यक्त करत कंपनीकडेही तक्रार केली.
एकावेबसाईटने बडवायजर कंपनीतील कर्मचारी गेली 12 वर्ष बिअरच्या टँकमध्ये मूत्रविसर्जन करत होता, अशी हेडलाईन देऊन बातमी केली होती. यात कर्मचाऱ्याचं बदललेलं नावही देण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले होते. या कंपनीतील 750 कर्मचारी हे कृत्य करत असल्याचे या बातमीत म्हटले होते. मात्र, ही बातमी खोटी असल्याचे आता समोर आले आहे. याला गंभीरतेने घेऊ नका. यामुळे बिअरप्रेमींना आणि विशेषकरुन बडवायजर पिणाऱ्या लोकांनी या बातमीने काळजी करण्याचे कारण नाही.