मुंबई | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मिडीयावर घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. यानंतर अनेक सेलेब्रिटींनी देखील घराणेशाहीच्या मुद्द्यावर टीका केलीये. या वादात आता अभिनेत्री तापसी पन्नूही उडी घेतली आहे. बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीची आपल्याला देखील सामना करावा लागला असल्याचं तापसीने एका मुलाखती दरम्यान सांगितलं.
तुम्ही स्टार किड असाल किंवा तुम्हाला फिल्मी बॅकग्राऊंड असेल तर इंडस्ट्रीत तुम्हाला जास्त स्ट्रगल करावं लागत नाही. उलट इंडस्ट्रीच्या बाहेरुन आलेल्यांना फार मेहनत घ्यावी लागते तसंच स्वतःची ओळख बनवावी लागतात. अनेक बॉलिवूड दिग्दर्शकही ओळखीच्या सेलेब्रिटींना काम देतात. अशावेळी बाहेरून आलेल्यांना संधी मिळत नाही. यामुळे अनेकदा मलाही काही चित्रपच गमवावे लागलेत, असं तापसीने म्हटलं आहे.
बाहेरुन आलेल्या प्रत्येक कलाकाराने हे समजून घ्यावं की, कौशल्य असलं तर तुम्ही नक्की यशस्वी होणार. त्यावेळी मिळालेलं यश हे केवळ तुमचंच असेल. प्रेक्षकांनाही स्टार किड्सपेक्षा बाहेरुन आलेले कलाकार आवडतात, असं तापसी म्हणाली आहे.
बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून तापसीला ओळखलं जातं. तापसीने बॉलिवूडमध्ये एक स्वतःची वेगळी ओळखही निर्माण केलीये.