राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने आज फर्ग्युसन कॉलेज रोड येथे शिंदे सरकारने गोविंदा पथकातील मुलांना MPSC परीक्षेतिल आरक्षणाच्या निर्णया विरोधात पारंपरिक खेळ खेळून विरोध व्यक्त करीत आंदोलन केले.
यावेळी मंगळागौरी, गोट्या, विट्टी दांडू, सापशिडी असे अनेक खेळ खेळून हे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना देखील आरक्षण द्यावे ही मागणी केली. या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, महेश हांडे, सुषमा सातपुते यांच्यासह पक्षातील अनेक महिला पदाधिकारी व इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.