मुंबई : सुप्रीम कोर्टाकडून पुण्याच्या प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मिळत असून हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडी सरकार जावून राज्यात नवीन शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी 2017 नुसार महापालिका निवडणुका घेण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार तीन ऐवजी चारचा प्रभाग करण्याचा निर्णय झाला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शहर काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टाकडून आता पुण्याच्या प्रभाग रचना बदलला स्थगिती मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसणार आहे.