पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित “उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” व “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२”

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित “उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” व “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२”

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या “उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” व “गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२२” या शहर स्तरावरील स्पर्धांची घोषणा आज शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.



तसेच कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर होणाऱ्या या गणेशोत्सवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते पुणे शहरातील गणेशोत्सवात सहभागी होणार असून राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार दि.४ सप्टेंबर रोजी पुण्यात असतील तर दि.३ सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दि.५ ते ८ सप्टेंबर दरम्यान खासदार सौ.सुप्रियाताई सुळे , २ सप्टेंबर रोजी डॉ.अमोल कोल्हे हे पुणे गणेश दर्शन दौऱ्यावर असणार आहेत.

या स्पर्धेची माहिती देताना श्री.प्रशांत जगताप म्हणाले की , संपूर्ण पुणे शहर स्तरावरील मंडळांसाठी राबविली जाणारी ही सर्वात मोठी स्पर्धा असून या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. “सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा” ही शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी घेण्यात येत असून या स्पर्धेसाठी शहरस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपयांचे आहे. द्वितीय ७५,००० , तृतीय ५१,००० , चतुर्थ ३१,००० , पाचवे २१००० तर विधानसभानिहाय बक्षिसे प्रथम २५,००० ,द्वितीय १५,००० , तृतीय ५००० अशी आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षकांची टीम संपूर्ण शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेट देणारा असून या सर्व मंडळांच्या प्रत्यक्ष पाहणी नंतर बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत. स्पर्धेतील सर्व सहभागी मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी गणेश मंडळांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.


त्यासाठी या +919096256319,+919096848484 क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत पुणे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मी आपणास करत आहे.

पुणे शहरातील सर्व महिला भगिनींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खास पुणे शहरस्तरीय “गौरी गणपती” स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिला भगिनींनी आपल्या घरच्या गौरी गणपतीच्या सजावटीचे फोटोज या क्रमांकावर पाठवायचे आहेत. उत्कृष्ट सजावट केलेल्या महिलाभगिनींना एलईडी स्मार्टटीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा गृह उपयोगी साहित्याची विविध बक्षिसे देण्यात येणार असून, सहभागी प्रत्येक महिलेचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.या स्पर्धेत देखील शहरातील सर्व महिला भगिनींनी सहभागी व्हावे.

SHOUT

Shout is a network for quality journalism with a twist. It’s quick, controversial, freaky, fresh and sharp.

Post a Comment

Previous Post Next Post

Comments System

Facebook