कर्जत विधानसभा मतदारसंघात आगामी काळातील सर्व निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,राष्ट्रवादी काँगेस पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केला.
कर्जत येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क कार्यालय असलेल्या शिवालय मध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघात आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका यांच्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी आमदार सुरेश लाड,जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव,कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे,तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील,कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांच्या वतीने कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,राष्ट्रीय काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडीची घोषणा केली.राज्यात या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला असून स्थानिक पातळीवर तेथे तेथे निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते.त्यानुसार महाराष्ट्र राज्यात ज्याप्रमाणे,त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यात आणि त्याप्रमाणे कर्जत तालुक्यांत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.पत्रकार परिषद मध्ये निर्णय जाहीर करण्याचे आदेश वरिष्ठ यांच्याकडून देण्यात आले आहेत आणि त्यामुळे आज 20नोव्हेंबर रोजी घेतली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी याबाबत घोषणा केली.राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी यांनी आम्ही भारत जोडो अभियान मध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकारी एकत्र होतो आणि त्यावेळी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही महविकास आघाडी मधूनच ग्रामपंचायत निवडणुकांना सामोरे जाणार आहोत असे ठरले आहे.शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी सर्व निवडणुका एकत्रपणे लढणार असून जिंकणार आहेत असे जाहीर केले.